राजमुद्रा : प्रहार जनशक्ती पार्टीच्या युवक उपजिल्हाध्यक्ष पदावर राकेश अरुण भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदातून प्रहार जनशक्तीचे राज्यात संघटनात्मक विस्तार करून राज्यातील विविध घटकांना पक्षाच्या मुख्य प्रवास जोडण्याचा दायित्व त्यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रहार जनशक्ती पार्टीचे अनिल चौधरी यांच्याकडून देण्यात आला आहे. तसेच त्यांनी राकेश भंगाळे यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.. तसेच प्रहारचा आजवरचा नवलौकिक आणि सामान्य माणसाच्या कल्याणाचा लढा पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल अशा शुभेच्छा देखील त्यांच्याकडून देण्यात आल्या आहेत.