चोपडा राजमुद्रा वृत्तसेवा | चोपडा येथील बहुजन मुक्ती पार्टी तर्फे आज वाढत्या वीज बिलाचे विरोधात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसिलदार अनिल गावित यांना शिष्टमंडळाने कंदील भेट भेट दिले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
निवेदनात या प्रमुख मागण्या करण्यात आल्या नआहेत
दोनशे युनिट पर्यंत वीज बिल माफ करण्यात यावे, मीटर भाडे कपात करण्यात यावे, विजेचा स्थिर आकारावर प्राथमिक भावाप्रमाणे दर आकारणी करावी, सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी यासह यात इतर मागण्यांचा समावेश आहे. यावेळी जळगाव लोक सभा प्रभारी बहुजन मुक्ती पार्टीचे रवींद्र वाडे, बहुजन क्रांती मोर्चाचे अध्यक्ष सय्यद असगर अली, जिल्हा संघटक भारती वाडे, उपाध्यक्ष बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क आधार करंदीकर, गेमा बारेला, नजीर काझी, मुबारक कुरेशी, सुनील केदार आदी उपस्थित होते.