राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला.. भाजपचे खासदार उमेश पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.. त्यांच्या या प्रवेशानंतर त्यांना आगामी विधानसभेत संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.. ठाकरे गटाकडून चाळीसगाव येथील जागेवर उन्मेष पाटील यांना तिकीट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.. उन्मेष पाटील हे एबी फॉर्म घेऊन मुंबईवरून चाळीसगावच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, उन्मेष पाटील यांच्या नावाची पक्षाकडून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार असलेल्या उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं. उन्मेष पाटील यांच्या ऐवजी स्मिता वाघ यांना तिकीट देण्यात आलं. त्यामुळे उन्मेष पाटील प्रचंड नाराज झाले होते. या नाराजीतूनच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. मध्यंतरी त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली अन् आज अखेर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांचे शेकडो समर्थक उपस्थित होते. त्यांच्या समर्थकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजीही केली. उन्मेष पाटील यांच्या प्रवेशामुळे जळगावात ठाकरे गट अधिक मजबूत झाला आहे.. आता आगामी विधानसभा निवडणुकीचे चाळीसगावच्या जागेवर त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे..
दरम्यान २०१४ साली उन्मेष पाटील हे चाळीसगावमधून आमदार म्हणून निवडून आले होते. उन्मेष पाटील जळगाव लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. एप्रिल महिन्यात उन्मेष पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला आहे.