राजमुद्रा : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठा डाव टाकला आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे.. या निवडणुकीसाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार त्यांच्याचं पुतण्याला उमेदवारी देऊन रिंगणात उभे करणार आहेत..अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना शरद पवार उमेदवारी देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे बारामतीत आता निवडणुकीच्या रिंगणातही काका विरूद्ध पुतण्या संघर्ष पाहायला मिळणार आहे.
राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर बारामती नक्की कोणाची अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधान आलं.. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत बारामती जनतेचा कौल कुणाला असणारे याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोचले असताना शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. युगेंद्र पवार यांना एबी फॉर्म दिल्याचीही माहिती आहे.
दरम्यान बारामती विधानसभेसाठी पवार विरुद्ध पवार असा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.. या मतदारसंघातून पवार घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाणार आहे. शरद पवार यांचे पुतणे आणि अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार विधानसभा लढणार आहेत. राज्याच्या राजकारणात काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांच्यात संघर्ष सुरु आहे. अशातच आता बारामतीच्या निवडणुकीतही काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर आता विधानसभेची निवडणूकही पवार विरूद्ध पवार अशी होणार आहे.