राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहर विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.. या मतदारसंघात महाविकास आघाडी कडून उमेदवार कोण असणार आणि जागा नेमकी कोणत्या पक्षाला सुटणार या बाबतची उत्सुकता ताणली गेली होती.. मात्र आता धुळे शहर विधानसभेच्या जागेवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेच्या ठाकरे गटाने माजी आमदार अनिल गोटे यांची उमेदवारी निश्चित केली असल्याची माहिती समोर आली आहे..ते लवकरच शिवबंधन हाती बांधून विधानसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे दिसून येत आहे..
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी धुळ्याचा दौरा केला.. या दौऱ्यादरम्यान माजी आमदार अनिल गोटे यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली त्यानंतर त्यांनी शिवबंधन हाती घेण्याचे ठरवलं… यासंदर्भातील माहिती खुद्द माजी आमदार गोटे यांनी दिली असून ते 24 ऑक्टोंबर रोजी मातोश्रीवर जाऊन हाती शिवबंधन बांधणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नुकतीच धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपने अनुप अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर केली..मात्र अद्यापही महाविकास आघाडीच्या वतीने धुळ्यातील एकही उमेदवार जाहीर झालेला नाही त्यामुळे महाविकास आघाडी काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे.
दरम्यान अनिल गोटेंची लोकसंग्राम संघटना महाविकास आघाडीचाच घटक असून ते लोकसंग्राम ऐवजी शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.