राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील रावेर यावल मतदार संघात राजकीय घराण्यांचीं प्रतिष्ठा पणाला लागली आहे.. या मतदारसंघातून चौधरी आणि जावळे यांच्या घराण्यातून युवा पिढीला निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यात आले आहे.. रावेर विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाचे निवडणून आलेले एकमेव आमदार शिरीषदादा चौधरी यांचे चिरंजीव धंनजय चौधरी यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे.. तर भाजपाने देखील युवा चेहरा देत स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे. दोनही उमेदवार पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवीत असून दोघांही उमेदवारांना राजकीय वारसा आहे त्यामुळे लढत चूरशीची होणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदार संघात एकमेव काँग्रेसचे आमदार शिरीषदादा चौधरी आहेत.. दरम्यान २००९ मधील अपक्ष लढण्याचें त्यांनी केलेले धाडस ते पुन्हा 2019 मध्ये ते निवडून आले.. यंदाच्या आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपले चिरंजीव धनंजय चौधरी यांना रिंगणात उतरल असल्यामुळे वडील विद्यमान आमदार शिरिषदादा यांची प्रतिष्ठा शाबूत राखत आपल्या शिरपेचात आमदारकीचा मानाचा तुरा रोवण्याचं कसं त्यांना यशस्वी करावं लागणार आहे..दरम्यान काँगेस पक्षाने काही महिन्यापूर्वी धनंजय चौधरी यांची उमेदवारी जाहीर केल्याने धनंजय चौधरी यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला, त्याचा अपेक्षित परिणाम साधला जाईल त्यामुळे विजयश्री खेचून आणायचा असा त्यांचा निर्धार आहे.
नुकतीच या मतदारसंघात भाजपने खासदार आणि आमदार तसेच या भागाचे शेती मित्र म्हणून उपस्थित असणारे स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे यांना पहिल्या यादीत स्थान दिले. दरम्यान याआधी स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांनी रावेर लोकसभेचे खासदार आणि विधानसभा आमदार असताना मतदारसंघात कार्यकर्त्यांचा केलेलं जाळ यंदाच्या आगामी विधानसभेत अमोल जावळे यांना फायदेशीर ठरणार आहे.. दरम्यान त्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागली असून आगामी विधानसभा निवडणुकीत आमदारकीचा मानाचा तुरा रोवण्याचं काम त्यांनाही यशस्वी करावा लागणार आहे. त्यामुळे रावेर यावल मतदार संघात आता राजकीय घराण्याच्या वारसांची कसोटी लागली असल्यामुळे या मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिला आहे.