राजमुद्रा : राष्ट्रवादीत बंड करून महायुतीत सामील झालेल्या अजित पवार यांना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दापोली विधानसभा मतदारसंघात धक्का बसला आहे.. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उपजिल्हाध्यक्ष, दापोली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष खालीद रखंगे सह सात नगरसेवकांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे याचा फटका आगामी विधानसभेत अजित पवार यांना होणार का हे पाणी महत्वाचे ठरणार आहे..
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजला असून सर्व राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे..22 ऑक्टोंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. 29 ऑक्टोंबरपर्यंत उमदेवारी अर्ज दाखल करता येणार असून 4 नोव्हेंबरपर्यत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत.. दापोली विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटा विरुद्ध बंडाचे निशाण उभारला आहे..
दरम्यान दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने. दापोलीमधून योगेश कदम यांना उमेदवारी दिली आहे, ते रामदास कदम यांचे सुपूत्र आहेत. तर दुसरीकडे आघाडीचा घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे गटाने दापोलीतून संजय कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दापोलीतील सात नगरसेवकाने उद्धव ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम यांना बळ मिळणार आहे .
खेड-दापोली-मंडणगड, रत्नागिरी, राजापूर, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी या विधानसभा मतदारसंघात थेट शिंदे सेना विरुद्ध उद्धव सेना असाच सामना रंगणार आहे.. त्यामुळे विधानसभेत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..