राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजला असताना सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर करण्यात येत आहेत.. या निवडणुकीसाठी ठाकरे गट ही जोमाने मैदानात उतरला असून दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्या मानहान प्रकरणी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.. दंडाधिकारी न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षिविरोधात राऊत यांनी दाखल केलेल्या अपील वर आज सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.. त्यामुळे आता या सुनावणीत राऊतांना दिलासा मिळणार की त्यांच्या अडचणीत वाढ होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिल आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात शिवडी कोर्टाने त्यानं दोषी ठरवले होते. कोर्टाने संजय राऊतांना १५ दिवसांची कोठडी व २५ हजारांचा दंड देखील ठोठावला होता. शिक्षा सुनावली गेल्यानंतर संजय राऊतांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. सत्र नायायालयाने संजय राऊतांना जामीन मंजूर केला आहे. मेधा सोमय्यांनी २०२२ मध्ये संजय राऊतांविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.
शिवडी कोर्टाने राऊतांना शिक्षा सुनावल्यानंतर राऊतांनी सत्र न्यायालयात धाव घेतली.. दरम्यान आज होणाऱ्या सुनावणीत संजय राऊत यांना दिलासा मिळणार की त्यांची अडचण वाढणार हे पाणी महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान संजय राऊत यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी तातडीने जमिनीसाठी अर्ज केला होता..त्यानुसार न्यायालयाने अपील करण्यासाठी त्यांना मुभा देत पंधरा हजारांच्या जात मुचंलक्यावर जामीन मंजूर केला होता..