राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट ऍक्टिव्ह मोडवर आला असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने अजित पवार गटात खळबळ उडाली आहे.. शरद पवार यांचे मला दुरून आशीर्वाद राहणार आहे तसे त्यांनी म्हटले आहे.. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे..
विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजल असून राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे नेते धनराज महाले हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. ही जागा शिवसेनेला मिळावी, यासाठी धनराज महाले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मात्र नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी जाहीर झाल्याने धनराज महाले यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे.यावर बोलताना ते म्हणाले, मी धनराज महाले यांना विनंती करणार आहे आणि ते उमेदवारी अर्ज मागे घेतील असा मला विश्वास आहे”, असे विधान नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.