जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | महापालिकेत महापौर निवडणुकी दरम्यान भाजपच्या फुटलेल्या बंडखोर नगरसेवकांना नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आपत्रतेची कार्यवाही करण्या संदर्भात नोटीस जाहीर केली आहे यामुळे आधीच कायदेशीर लढा देणारे बंडखोरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी पूर्वाश्रमीच्या भाजप नगरसेवक असलेल्या एकूण सत्तावीस नगरसेवकांनी शिवसेनेच्या महापौरांच्या उमेदवार असलेल्या जयश्री महाजन यांना पाठींबा दर्शवल्याने भाजप फूटी च्या उभरट्या वर आली होती हे संपत नाही तोवर आणखी तीन नगरसेवकांनी शिवसेनेत शिवबंधन बांधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित प्रवेश केला होता .
भाजपने एकूण तीन हजार पानांची याचिका नाशिक विभागीय आयुक्तालयात दाखल केली आहे. यामध्ये बंडखोर असलेल्या नगरसेवकांची संपूर्ण कुंडली आहे बंडखोर नगरसेवकांना जरी नोटीस जाहीर झालेली असली तरी राज्यातील सत्तेत असलेल्या शिवसेनेचा त्यांना किती लाभ होतो याकडे लक्ष लागले आहे.