राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून असणारा तिढा आता सुटला आहे.या मतदारसंघात माजी महापौर जयश्री महाजन यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.. त्यामुळे ठाकरेंची मशाल घेऊन त्या विधानसभेच्या रिंगणात उतरणार हे आता स्पष्ट झाल आहे.
महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या माध्यमातून माजी महापौर जयश्री महाजन यांना उमेदवारी मिळावी यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे… मात्र आघाडीची जागा कायम ठेऊन जळगाव शहर व जळगाव ग्रामीण या जागाची आदलाबदली करण्याचा किंवा उमेदवारांना पक्ष बदलण्यास सांगून त्या त्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा पर्याय त्यांनी कायम ठेवला.. त्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी महापौर जयश्री महाजन विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे स्पष्ट झाला आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असताना सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे.. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.. या पार्श्वभूमीवर माजी महापौर जयश्री महाजन यांना ठाकरेंची मिळालेली उमेदवारी पाहता विधानसभेच्या आखाड्यात मशाल पेटवणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे..
विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गट सज्ज झाला आहे. ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 65 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे,,,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून कोपरी – पाचपाखडी मतदारसंघातून केदार दिघे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघात माजी खासदार राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. चाळीसगावातून माझी खासदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार, उन्मेष पाटील यांना चाळीसागावातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पाचोऱ्यात शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून त्यांच्याच चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणची लढत प्रचंड चुरशीची होणार आहे. बाळापुरात पुन्हा एकदा नितीन देशमुख यांना संधी देण्यात आली आहे. नितीन देशमुख हे शिंदे गटाच्या आमदारांसोबत सुरतला गेले होते. पण ते रातोरात पुन्हा ठाकरे गटात आले होते.