राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे ग्रामीण आमदार आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा शिवसेनेकडून संधी देण्यात आली आहे. आज मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत धरणगाव येथे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
या शक्तिप्रदर्शन करताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.. तसेच येणाऱ्या 23 तारखेचा गुलाल हा या गुलाबराव पाटलाच्या अंगावरती पडणार असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.. यावेळी शहराच्या मुख्य मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत जनतेला पुन्हा एकदा विजयी करण्याचे आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
दरम्यान याआधी उमेदवारी मिळाल्यानंतर ते म्हणाले होते,मी जनतेशी ठेवलेला संपर्क आणि सरकारच्या माध्यमातून जनतेची केलेली कामे त्यामुळे जनतेचा मिळालेला आशीर्वाद यावर विधानसभा लढवत आहे मला खात्री आहे,जनता मला नक्की आशीर्वाद देईल असे त्यांनी म्हणत विधानसभा निवडणुकीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.