(राजमुद्रा मुक्ताईनगर) मुक्ताईनगर कुऱ्हा येथील आरोग्य वर्धिनी या लसीकरण केंद्रावर खासदार रक्षाताई खडसे यांनी भेट दिली. केंद्रावरील लसीकरण व पुरवठ्याबदल डॉ.तोडसम यांचेकडून माहिती जाणून घेतली. सोबतच कुऱ्हा येथे तत्काळ एक हजार कोविड अँटीजन टेस्ट कीट पुरवण्यात येण्याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांना निर्देश दिले. याप्रसंगी बेटी बचाव बेटी पढावचे योजनेचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, माजी जि.प.अध्यक्ष अशोक कांडेलकर, प.स.सदस्य राजेंद्र सवळे, डॉ. बी. सी. महाजन, विनोद पाटील, शहर अध्यक्ष रवींद्र राजपूत, शहर सरचिटणीस प्रविण शिंपी, सचिन महाले आदी मान्यवर उपस्थित होते.