राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.. या मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे अशी काटे की टक्केवारी होणार असल्याचे दिसून येत आहे.. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवा डाव टाकत शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरे यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत..
वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. मात्र सध्या या मतदारसंघात त्यांच्याविरुद्ध मनसेने संदीप देशपांडे यांना उमदेवारी दिली आहे. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाकडूनही उमदेवार उतरवला जात आहे. त्यामुळे वरळी विधानसभेत तिहेरी लढत होण्याची चिन्हं आहेत.दरम्यान आदित्य ठाकरे यांनी 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात आदित्य ठाकरेंना घेण्यासाठी महायुती आणि मनसेने तयारी केली असल्याचा दिसून येत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघातून शिंदे फडणवीस यांनी मोठा मास्टर प्लॅन तयार केला आहे. दरम्यान मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघाचेही माजी खासदार आहेत. त्यामुळे जर मिलिंद देवरा यांना शिंदे यांच्या शिवसेनेने मैदानात उतरवलं तर आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मात्र, मनसेने गेल्या लोकसभेत महायुतीला पाठिंबा दर्शविला होता त्यानंतर आता आगामी विधानसभेसाठी राज ठाकरे यांची महायुतीशी जवळीक वाढल्यानं त्यांच्याकडून आदित्य ठाकरे यांच्या पराभवासाठी महायुतीला मदत केली जाऊ शकते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.