राजमुद्रा : विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता विविध पक्षातील उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.. अशातच आता मावळ विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मोठी खेळी खेळली जाणार आहे..अजित पवारांचे उमेदवार सुनील शेळकेंना घेरण्यासाठी मावळमध्ये सांगली पॅटर्न राबवला जाणार आहे. त्यासाठी शरद पवार इथं उमेदवार देणार नसून, बंडखोर बापू भेगडेंना मविआचा पाठिंबा जाहीर करणार आहेत अशी माहिती समोर आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत मविआच्या जागावाटपात मावळ शरद पवार गटाच्या वाट्याला येणार आहे. म्हणूनचं बंडखोर बापू भेगडेंनी शरद पवारांकडे पाठिंबा देण्याची मागणी केलेली आहे. पवारांकडून सुद्धा या मागणीला संमती मिळणार असं जवळपास निश्चित मानलं जातं आहे. दरम्यान बापू भेगडेंना मावळ भाजपने आधीचं पाठिंबा जाहीर केला आहे, अशातच आता सुनील शेळकेंच्या पराभवासाठी शरद पवार सुद्धा हा नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत.
मावळ मतदार संघात राष्ट्रीय घडामोडींना चांगलाच वेगळा आहे या मतदारसंघातील अजित पवार गटाची उमेदवार सुनील शेळके यांना कोंडीत पकडण्यासाठी आता काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना ही भेगडेंना पाठिंबा देत शेळकेंना कोंडीत पकडणार असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळं अजित पवार गटाच्या सुनील शेळके विरोधात अवलंबला जाणारा हा मावळ पॅटर्न अतीतटीचा होणार, हे उघड आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिला आहे.