राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी अजित पवार गटाचा राजीनामा दिला आहे.. त्यामुळे महायुतीला मोठा धक्का बसला आहे.. या राजीनाम्यानंतर आता समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे..
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नाशिकच्या नांदगाव मध्ये आमदार सुहास कांदे यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र याच ठिकाणाहून आता छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे..दरम्यान नांदगाव मध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावरून बोलताना छगन भुजबळ यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे.. सगळ्या पुण्याचा डीएनए सारखाच आहे असे मला वाटते कारण ते पुतणे काकाचं काहीच ऐकत नाहीत असा टोला छगन भुजबळ यांनी समीर भुजबळ यांना लगावला..
राज्याच्या राजकारणात याआधी काका पुतण्यांचा संघर्ष हा नेहमीच चर्चेत राहिला आहे.. कारण याआधी बाळासाहेब ठाकरे -राज ठाकरे तर शरद पवार- अजित पवार ही राजकारणातील जोडी देशभर प्रसिद्ध आहे.. असंच आता नाशिकमध्येही काका पुतण्यांची चर्चा जोरदार सुरू आहे.. आता या नांदगाव मतदारसंघात मद्रेश छगन भुजबळ यांना घरातूनच आव्हान मिळाला असल्याने याचा गड कोण राखणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..