जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव शहर महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्यपदी शिवसैनिक विराज कावडीया यांची निवड करण्यात आली असून याबाबतचा आदेश संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी आज दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी नाव सुचवण्या बाबत शिवसेनेच्या दिग्गजांमध्ये बऱ्याच काळावढीपासून चर्चा सुरू होती. जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख संजय सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जळगाव शहर महानगरपालिका विरोधीपक्षनेते सुनील महाजन तसेच ज्येष्ठ नेते सुरेश जैन यांच्यात ही रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदाच्या उमेदवाराचे नाव सुचवण्यावरून चर्चा चालू होती. त्यांच्या चर्चेने आता विराम घेतला असून चर्चेत शिवसैनिक विराज अशोक कावडीया यांची रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्यपदी शिफारस करण्यात आली. त्यानुसार आज त्यांची या पदावर निवड करण्यात आली असून, याबाबत आदेश संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी आज रोजी दिला.