राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केला जात आहे.. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवसापासून दिल्लीत आहेत ते काय करणार काय होणार याची त्यांना काही माहिती नाही मात्र त्यांच्यामुळे शिवसेनेला कलंक लागतोय असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
शिवसेना चोरणारे स्वतःला डुप्लिकेट म्हणून मुख्यमंत्री म्हणणारे एकनाथ शिंदे हे दिल्लीत चारपाच दिवस ताटकळत बसले आहेत. जागावाटप कधी होणार, काय होणार हे त्यांनाही माहिती नाही… एक काळ होता की जेव्हा भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे मुंबईत मातोश्रीवर येऊन चर्चा करत होते. मात्र, सध्याचे चित्र उलट असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला….
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमच्या महाविकास आघाडीत कोणताही मतभेद नाही सर्व जागा चे उमेदवार ठरले असून आगामी निवडणुकीत बाजी मारणार असल्याचाही विश्वास त्यांनी व्यक्त केला..या निवडणुकीत मित्रपक्षही आमच्यासोबत आहेत. कोणताही मित्रपक्ष नाराज होणार नाही, एवढ्या जागा त्यांना सोडण्यात येणार आहेत”, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.