राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या तरी बीड जिल्ह्यातील दोन आमदारांची उमेदवारी वेटिंगवर असल्याने उमेदवारीचा सस्पेन्स वाढत चालला आहे. या आधी या जिल्ह्यात सर्वप्रथम महायुतीकडून केजमधून भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने पालकमंत्री धनंजय मुंडे यांना परळीतून तर प्रकाश सोळंके यांना माजलगावमधून उमेदवारी जाहीर केली.परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर अद्यापही उमेदवारींसाठी वेटींगवरच आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित होणार की नाही याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे..
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षाकडून उमेदवारी याद्या जाहीर करण्यात येत आहेत.. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर आमदार आणि जिल्हाध्यक्षही आहेत. पक्षाने जिल्ह्यातील आष्टीतून युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, केजमधून माजी आमदार पृथवीराज साठे यांच्या नावांची घोषणा केली आहे मात्र संदीप क्षीरसागर यांना अद्यापही उमेदवारी जाहीर केलेली नाही.. त्यांच्या उमेदवारीला पक्षातून विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे..गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी भाजप सोडले आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा प्रश्न नाही.
दरम्यान आगामी विधानसभा च्या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाने स्पर्धा वाढली आहे