राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे..भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी आज माझगांव कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी त्यांची पंधरा दिवसाची कोठडी स्थगित झाली असून या प्रकरणात 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 31 जानेवारी 2025 ला होणार आहे.
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या विरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात दंडाधिकारी कोर्टाने दोषी ठरवत राऊतांना 15 दिवसांची कोठडी आणि 25 हजारांचा दंड देखील ठोठावला होता. याच प्रकरणी संजय राऊत यांच्या अपील अर्जावर आज माझगांव सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणी त्यांना दिलासा मिळाला आहे..
दरम्यान या आधीच्या सुनावणीत विशेष म्हणजे कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, असं कोर्टाने संजय राऊतांना काल खडेबोल सुनावले होते. जामीन अर्जच्या सुनावणी वेळी अपीलकर्ता हे स्वतः हजर राहणे गरजेचं, असा युक्तिवाद मेधा सोमय्या यांच्या वकिलांनी काल केला होता. त्यानंतर आज पुन्हा सुनावणी पार पडली. त्यावेळी स्वतः संजय राऊत हे उपस्थित होते…