राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा भडगाव विधानसभेमध्ये परिवर्तन महाशक्ती या नव्या आघाडीने उमेदवार दिला आहे.. या मतदारसंघातून प्रताप हरी पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, त्यांना निवडणूकीचा AB फॉर्म सुपूर्त करण्यात आला. उमेदवारी जाहीर केल्यानंतर पाचोरा विधानसभा जिंकायची असा निर्धार प्रताप हरी पाटील यांनी व्यक्त केला..यावेळी पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव, डॉ. पूनम पाटील, गणेश सोनवणे, चेतन पाटील, प्रतिक पाटील उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वराज्य पक्ष,प्रहार जनशक्ती पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना,स्वतंत्र भारत पक्ष, महाराष्ट्र राज्य समिती व भारतीय किसान पार्टी यांच्या एकत्रीकरणातून परिवर्तन महाशक्ती आघाडी उदयास आली आहे.. या आघाडी कडून दहा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे..
यामध्ये अचलपूरमधून बच्चू कडू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर रावेरमधून अनिल चौधरी, चांदवड विधानसभा मतदारसंघातून गणेश निंबाळकर, देगलूर बिलोलीमधून सुभाष साबणे, ऐरोलीमधून अंकुश कदम, हदगाव हिमायतनगरमधून माधव देवसरकर, हिंगोलीमधून गोविंदराव भवर, राजुरामधून वामनराव चटप यांनी विधानसभेसाठी तिकीट देण्यात आले आहे. तर शिरोळ आणि मिरज येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आल्या असून या जागांवर अद्याप उदेवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.
दरम्यान अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीषदादा चौधरी हेही 28 ऑक्टोबर रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.. या तिसऱ्या आघाडीने महायुती आणि महाविकास आघाडीचें उमेदवारी जाहीर करून टेन्शन वाढवले आहे..