राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना जळगाव, पारोळासह,अमळनेर, जळगाव शहर विधानसभा मतदार संघामध्ये बंडखोरीचे निशाण उभ राहिल आहे. या मतदारसंघात महायुतीतील भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी अनेक जण इच्छुक होते.. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही.. त्यामुळे या मतदारसंघात नाराजीचा सूर पसरला..त्यामुळे बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी नाराजांकडून करण्यात आली आहे. यामध्ये अमळनेर मतदारसंघात भाजपचे माजी आमदार शिरीष चौधरी हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. तर जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे महानगर उपाध्यक्ष तथा माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे हे उमेदवारी न मिळाल्याने नाराज असल्याने अपक्ष निवडणूक लढवणार आहे.
तर दुसरीकडे जळगाव शहर मतदार संघ, पारोळा- एरंडोल मतदारसंघ खासदार ए. टी.नाना पाटील उमेदवारी अपक्ष अर्ज दाखल करणार आहे. तर याच मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे डॉ. संभाजी पाटील हे सुद्धा उमेदवारी न मिळाल्याने नाराज असून ते अपक्ष निवडणूक लढवणार आहे. तर पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातून अमोल शिंदे यांनी भाजपमधून पुन्हा एकदा बंडखोरी करत आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे येत्या 28 ऑक्टोबर रोजी ते अपेक्षा उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत..त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील या चार मतदारसंघात महायुतीत बंडाचे निशाण दिसून आल आहे.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात फूट पडली असून भाजपच्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटांच्या नेत्यांच्या बंडखोरीमुळे विद्यमान उमेदवारांना त्याचा फटका बसणार असल्याचा दिसून येत आहे..