राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट ॲक्शन मोडवर आला असून आता शिवसेना (ठाकरे) पक्षाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 15 जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.यामध्ये धुळे शहर, चोपडा, जळगाव शहर, बुलढाणा, दिग्रस, हिंगोली, देवळाली, श्रीगोंदा, कणकवली, भायखळा, शिवडी, वडाळा, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, देवळाली, परतूर या मतदारसंघाचा सहभाग आहे.
शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर;
१) धुळे शहर- अनिल गोटे
२)चोपडा (अज)- राजू तडवी
३) जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन,
४) बुलढाणा- जयश्री शेळके,
५) दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल
६) हिंगोली- रूपाली राजेश पाटील
७) परतूर- आसाराम बोराडे
८) देवळाली (अजा) योगेश घोलप
९)कल्याण पश्चिम- सचिन बासरे
१० )कल्याण पूर्व – धनंजय बोडारे
११) वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव
१२ ) शिवडी- अजय चौधरी
१३) भायखळा- मनोज जामसुतकर
१४) श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे
१५) कणकवली- संदेश भास्कर पारकर.
दरम्यान याआधी शिवसेना ठाकरे गटाकडून 65 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती.. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे समोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच सर्वात मोठा आव्हान असणार आहे.. कारण या निवडणुकीत दोन्ही पक्षांचे अस्तित्व हे पणाला लागला आहे..