राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा हा वाढतचं चालला आहे.. या आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागा वरून रसिखेच सुरु आहे.. अशातच ठाकरे गटाने जाहीर केलेल्या यादीत काँग्रेसने दावा केलेल्या जागांचा समावेश असल्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे….. या पत्रामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले असून या नाराजीचा फटका आता मातोश्रीवर चर्चेसाठी येणाऱ्या काँग्रेसने त्यांना बसला आहे.. दरम्यान महाविकास आघाडीतील जागांचा घोळ सुटणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे..
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लिहिलेल्या पत्रात उद्धव ठाकरेंच्या यादी बद्दल तक्रार करण्यात आली आहे..जागा वाटपच्या चर्चेत ठाकरे गटाने जाहीर केलेल्या यादीतील 12 जागांवर काँग्रेसने दावा केला आहे.. मुंबई आणि विदर्भातील आहेत..या जागा कोणी लढवायच्या याबाबत निर्णय झाला नाही. त्यानंतर शिवसेना उबाठाने परस्पर उमदेवार जाहीर केले. ते योग्य नाही, असा आशयाचा मजकूर या पत्रात आहे. त्या या पत्रामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले आहेत..
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही जागावरील दावा सोडण्यास ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे तयार झाले होते. परंतु या पत्रानंतर त्यांनी माघार न घेण्याचे ठरवले असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील ठाकरे आणि काँग्रेस यांच्यातील जागावरूनचा वाद हा वाढत असल्याचा दिसून येत आहे..