राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून चार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.. अशातच आता ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात मनसेने माघार घेतली असल्याची माहिती समोर आली आहे..ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणूक लढवणार आहेत. मात्र मैत्रीपूर्ण संबंध असल्याच्या कारणावरून त्यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे.
कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून मनसेचे अभिजित पानसे हे उभे राहणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आता एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार उभा करणार नसल्याचे समजत आहे.. तर दुसरीकडे राजपुत्र अमित ठाकरे यांच्याविरोधात मात्र शिंदे गटाने उमेदवार उभा केला आहे. अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदेगटाकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान ठाण्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे मनसे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात उमेदवार देणार नाही.. यावर ‘राज ठाकरे दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आहे असल्याचे वक्तव्य जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केल आहे..दरम्यान या , ठाणे शहर मतदारसंघातून अविनाश जाधव, ओवळा माजिवडा मतदारसंघातून संदीप पाचंगे आणि कळवा मुंब्रा मतदारसंघातून सुशांत सूर्यराव हे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत..