राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे..एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने बबनराव घोलप यांचे पुत्र माजी आमदार योगेश घोलप (Yogesh Gholap) यांना उमेदवारी जाहीर केली आहे..
नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात (Deolali Assembly Constituency) महायुतीत (Mssahayuti) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीने विद्यमान आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) यानंतर ठाकरे गटाने माजी आमदार योगेश घोलप यांना उमेदवारी दिली आहे..
माजी मंत्री बबनराव घोलप हे देवळाली विधानसभा मतदार संघातून तब्बल पाच वेळा विधानसभेवर गेले आहेत. राज्याचे समाजकल्याण मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. त्यांची कन्या नयन घोलप-वालझाडे यांना ठाकरे गटानं नाशिकच्या महापौरपदी विराजमान केलं होतं. तर मुलगा योगेश घोलप यांना विधानसभेवर प्रतिनिधित्व करण्याची संधी ठाकरे यांनी दिली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देऊन ठाकरे गटाने योगेश घोलप यांना मैदानात उतरले आहे..
दरम्यान याआधी ठाकरेंच्या शिवसेनेतील मिलिंद नार्वेकर यांच्यावर टीका करत बबनराव घोलप यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. ठाकरेंची शिवसेना सोडत असताना अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. मात्र आता त्यांच्या मुलाला उमेदवारी दिल्याने त्यांनी आपल्या शिंदे गटाच्या शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे..