राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील कन्नड सोयगाव विधानसभेच्या जागासह दहा जागेचा तिढा काही दिवस सुटता सुटत नव्हता..मात्र आता कन्नड सोयगाव विधानसभेच्या जागेचा तिढा अखेर सुटला असल्याची माहिती समोर आली आहे.. भाजपचे वरिष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या आता शिंदे गटाकडून छत्रपती संभाजी नगर मधील कन्नड विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.त्या आज शिंदे गटात प्रवेश करणार असून त्यांना या मतदारसंघात उमेदवारी दिली जाणार आहे..
विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना छत्रपती संभाजी नगर मधील कन्नड विधानसभा निवडणुकीची जागा ही महायुतीतील शिंदे गटाला सुटली आहे.. या मतदारसंघातून आता संचना जाधव शिंदे गटाकडून रिंगणात उतरणार आहेत.. तर दुसरीकडे आता या जिल्ह्यातील औरंगाबाद पूर्व मतदार संघ महाविकास आघाडीत काँग्रेसला सुटला आहे.. या जागेसाठी काँग्रेसने एम के देशमुख यांना तिकीट दिल आहे..तसेच या मतदारसंघात आता एम आय एम या पक्षाने ही उडी घेतली आहे या पक्षाकडून इम्तियाज जलील यांना तिकीट मिळाला आहे.
दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरण बदलत आहेत.. अशातच आता भाजपचे वर्ष नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.. त्यामुळे छत्रपती संभाजी नगर मधील राजकीय समीकरणे बदलली जाणार असल्यास दिसून येत आहे..