राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल असून राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत होणार आहे.. मात्र या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आपले उमेदवार मैदानात उतरले आहेत. यामध्ये माहीम मतदारसंघातून त्यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.. आता त्यांना या मतदारसंघातून महायुतीने पाठिंबा द्यावा अशी भूमिका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली आहे.. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..
माहीम मतदारसंघात उद्धव सेनेने विभाग प्रमुख महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे.. तर शिंदे कडून विद्यमान आमदार सदा सर्वांकर यांना उमेदवारी देण्यात आले आहेत.. तरी याच मतदारसंघात मनसेकडून राजपुत्र अमित ठाकरे रिंगणात उतरले आहेत.. आता अमित ठाकरेंना या मतदारसंघात भाजपा पाठिंबा देणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागला आहे..
गेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि पर्यायाने भाजपा सह महायुतीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्थ पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता आगामी विधानसभेत महायुती किमान आम्ही ठाकरे यांना पाठिंबा देईल का असा प्रश्न पडला आहे.. यावर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले,अमित ठाकरे यांना समर्थन देण्याची भूमिका या निवडणुकीत घेतली पाहिजे असं मला वाटतं..याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी बोलणार असून ते निर्णय घेतील.. आता त्यांच्या या निर्णयात राजपुत्र आम्ही ठाकरे यांना पाठिंबा मिळणार की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.