राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजल असताना महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत.. अशातच आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या पुस्तकाने विधानसभेच्या राजकीय मैदानात एंट्री घेतली आहे.. त्यातच आता अनिल देशमुख यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील टरबूजा… या केलेल्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे..
या ट्विटमध्ये अनिल देशमुख यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील टरबूज्या… लवकरच तुम्हाला समजेल मी कोणाबद्दल बोलतोय. माझी थरारक आणि अंगावर काटा आणणारी आत्मकथा ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ मधील 16 आणि 20 नंबरच्या प्रकरणातील काही उतारे तुमच्याशी शेअर करतोय. ही फक्त एक झलक आहे, या पुस्तकात टरबूजाच्या विकृत राजकारणाचे खरे रूप जनतेसमोर आणणारे अनेक धक्कादायक खुलासे आहेत.” असे म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनिल देशमुख यांनी मोठे गौप्य स्फ़ोट केले आहेत..‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या पुस्तकात अनिल देशमुख यांनी सत्ताधाऱ्यांवर मोठे आणि गंभीर आरोप केले आहेत. आपल्या मागे केंद्र सरकारच्या आशीवार्दाने ईडी, सीबीआय मागे लागली. मला जेलमध्ये टाकण्यात आले. कशा पद्धतीने माझ्याविरोधात राजकीय कट करण्यात आला. याची सर्व माहिती मी ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या पुस्तकात सविस्तर दिल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत देशमुख यांच्या पुस्तकांच्या एंट्रीने मोठा धमाका होणार आहे..