राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असल्या तरी महाविकास आघाडीतील काही जागा वरील पेचं अजून सुटलेला नाही.. अशातच आघाडीतील घटकपक्षाकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत.. मात्र आता महाविकास आघाडीत भंडारा विधानसभेच्या जागेवरून बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे.. या मतदारसंघात काँग्रेसला तिकीट गेल्याने ठाकरेंचे शिवसैनिक बंडखोरी करण्याच्या तयारीत असून ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भंडाऱ्याची जागा ही शिवसेनेला न देता काँग्रेसने स्वतःकडे राखून ठेवली आहे.. या मतदारसंघात आघाडीच्या वतीने काँग्रेसने पूजा ठवकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसैनिक प्रचंड नाराज झाले असून शिवसेना नेते नरेंद्र पहाडे अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहेत.. त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ठाकरे गटाने बंडाचे निशाण उभे केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिंदे गटाचे शिवसेना उमेदवार विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर, काँग्रेस उमेदवार पूजा ठाकर आणि शिवसेनेचे बंडखोर नरेंद्र पहाडे यांच्यात सामना होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे..
दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील पक्षांकडून उमेदवारीची यादी जाहीर करण्यात आली.मात्र यादीत इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यामुळे उमेदवार नाराज झाले.मुंबई नादी नंतर आता पुण्यात ही ठाकरे गटामध्ये नाराजी दिसून आले आहे.. यामध्ये घाटकोपर पश्चिम विधानसभेत ठाकरे गटात बंडखोरी होणार असून इमरान शेख विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याचं समोर आला आहे.
विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपले असताना येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.. या निकालात महाविकास आघाडी की महायुती बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..