राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र या उमेदवारीवरून आघाडीमध्ये बिघाडी झाल्याच्समोर आल आहे..कल्याण डोंबिवली मधील चारही जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आल्यानं राष्ट्रवादीचा शरद पवार गट नाराज झाला आहे.. या विधानसभेच्या तोंडावर ठाणे जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष सुनील वडार पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत अपक्ष लढण्याची तयारी दर्शवली आहे.. तसेच नाराज शरद पवार गटाने चारही विधानसभेत ठाकरे गटाला मदत न करण्याची भूमिका घेतली आहे..
आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचा शिलेदार अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरणार आहे… कल्याण पूर्व मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार होते मात्र आता या जागा ठाकरे गटाला सोडले आहेत.. त्यामुळे शरद पवार गट नाराज झाला असून विधानसभेसाठी ठाकरे गटाला मदत न करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.. यावर बोलताना सुधीर वंडार पाटील म्हणाले, कल्याण पूर्वची जागा राष्ट्रवादीला दिली जाईल अशी आमची मागणी होती आणि त्या दृष्टीने कामालाही लागलो होतो.. परंतु वरिष्ठ जितेंद्र आव्हाड हे जाणून-बुजून ही जागा ठाकरे गटाला सोडत आहेत त्यांच्या या निर्णयामुळे आम्ही त्यांना मदत न करण्याचा निर्णय घेतला आहे.. त्यामुळे या मतदारसंघात मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे, असे त्यांनी
म्हटले.
दरम्यान याआधी ठाणे जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता 1999 पासून पालकमंत्री राष्ट्रवादीचे होते.. याचा अर्थ येथे राष्ट्रवादीचे सर्वात जास्त आमदार हे ठाणे जिल्ह्यातून निवडून येत होते.. मात्र आता विधानसभेसाठी ही जागा ठाकरे गटाला सोडण्यात आले आहे.. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाली असल्याचे दिसून येत आहे..