राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना आता बीड जिल्ह्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. या मुंडेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला गळती लागली असून महायुतीच टेन्शन वाढला आहे.विद्यमान आमदार, माजी आमदार, जिल्हाध्यक्ष यांच्या राजीनाम्यानंतर भाजपा प्रदेश सचिवांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे बीडमध्ये महायुतीचे टेन्शन चांगलेच वाढले आहे.
या बीड जिल्ह्यात भाजपाचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या पहिल्या राजीनाम्यानंतर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी पक्ष सोडल्यानंतर आता भाजपाचे प्रदेश सचिव राजेश देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
त्यामुळे भाजपला बीड जिल्ह्यात ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खिंडार पडत आहे. तर याच जिल्ह्यात आता शरद पवार गटाचे पारडे जड होत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत.. मात्र इच्छुकांना उमेदवारी न मिळालं ते बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत.. दरम्यान गेवराई विधानसभेचे आमदार लक्ष्मण पवार यांनी भाजपामधील अंतर्गत गटबाजीवर वक्तव्य करत भाजपला रामराम ठोकला.त्यानंतर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या पाठोपाठ माजी आमदार संगीता ठोंबरे रमेश आडसकर आणि आता भाजपाचे प्रदेश सचिव राजेश देशमुख यांनी पक्षश्रेष्ठीकडे राजीनामा सोपविला आहे. दरम्यान या राजीनाम्यानंतर बीड जिल्ह्यात मुंडेंना मात्र राजकीय अडचणींना सामोरे जावं लागणार आहे.