राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना मावळ विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच रंगला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात महाविकास आघाडी उमेदवार देणार नाही.. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवाराला पाठींबा देण्याचा मोठा निर्णय घेतला असून त्यामुळे सुनील शेळके यांच्या अडचणीत वाढ होणार आहे..
विधानसभा निवडणूक अवघ्या असताना महायुती आणि महाविकास आघाडीकडून शेवटच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत..पूर्ण कशा पार्श्वभूमीवर मावळ मतदार संघात बापूसाहेब भेगडे हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत.त्यांना आता महाविकास आघाडीतील शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांची ताकत वाढली आहे. मावळ विधानसभा निवडणुकीत राजकीय रंगत निर्माण झाली आहे.
या मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीचे सुनील शेळके तर सध्या अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्यात काटे की टक्कर होणार हे निश्चित आहे. दरम्यान महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना विजयी करण्याचा विडा उचलला असल्याने आमदार सुनील शेळके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.