राजमुद्रा : विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवरच राहिल्या असताना आता महायुती आणि महाविकास आघाडी कडून उमेदवारांच्या शेवटच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत.. या पार्श्वभूमीवरच सोलापूर जिल्ह्यातील राखीव असलेल्या मोहोळ मतदारसंघात असणारा उमेदवारचा सस्पेन्स आता संपला असून या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी रमेश कदम यांना उमेदवारी दिली आहे..
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून रमेश कदम हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. मात्र, त्यांच्या कन्येला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.उच्चशिक्षित असलेल्या सिद्धी कदम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा डाव टाकला आहे. आता तो प्रत्यक्ष निवडणुकीत यशस्वी होतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून तिन्ही उमेदवारी याद्या जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये एकूण 11 महिलांचा समावेश आहे… मोहोळ मतदारसंघातून सिद्धी रमेश कदम यांना उमेदवारी मिळाले आहे..यांनी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये सोशल सायन्समध्ये पोस्ट ग्रज्युएशन केलेले आहे. त्यानी एनजीओ म्हणूनही काम केले आहे. आता त्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत..
दरम्यान याआधी माजी आमदार रमेश कदम अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात होते. मात्र, वर्षभरापूर्वी त्यांची जामीनावर सुटका झाली आहे. पुढच्या राजकीय शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून रमेश कदम यांच्याऐवजी त्यांच्या कन्येला उमेदवारी दिली