राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल असून जळगाव जिल्ह्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना भारतीय जनता पार्टी कडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे..उद्या 28 रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे..
आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम उद्या आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जिल्ह्यातील तिन्ही मंत्री गिरीश महाजन,गुलाबराव पाटील, अनिल पाटील,खासदार स्मिता वाघ महायुतीचे सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत..
या ऐतिहासिक क्षणी आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांना शुभेच्छा तथा आशीर्वादाचा वर्षाव करावा. आपल्या संख्याबळाने आणि जोमाने राजू मामा यांचा अर्ज भरण्याचा सोहळा आणखीनच भव्य बनवूया..यावेळी तुम्ही आणि तुमचे सर्व मित्र-परिवार, नातेवाईक, कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आव्हान सर्वांना करण्यात आले आहे..
आमदार राजू मामा बोळे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीचा मार्ग हा शिवतीर्थ चौक व भाजप कार्यालय, नेहरू चौक, डॉक्टर आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशन, टॉवर चौक,प्रकाश मेडिकल चौक, बळीराम पेठ, वसंत स्मृती भाजप कार्यालंय असा आहे..