राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहीम मतदारसंघात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.या मतदारसंघात मनसे विरुद्ध शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढत होणार असल्याचे दिसून येत आहे.माहीम मतदारसंघातून मनसेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर हे रिंगणात उतरले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सदा सरवणकर हे माघार घेणार असल्याचे बोललं जात आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सदा सरवणकर यांना महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत. आता अमित ठाकरेंसाठी ते माहीम मधून माघार घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे..
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहीम विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला सदा सरवणकर, त्यांचा मुलगा समाधान सरवणकर उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर मध्यरात्री ही बैठक पार पडली. या बैठकीत सदा सरवणकर यांना माहीम मतदारसंघातून माघार घ्या, असा सल्ला देण्यात आला आहे. आता सदा सरवाणकर काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. सध्या मुंबईतील माहीम मतदारसंघावर सर्वांचेच लक्ष लागले आहे. मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघात मनसे विरुद्ध शिंदे विरुद्ध ठाकरे अशी बिग फाईट पाहायला मिळणार आहे.