राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना चोपडा विधानसभेत नाराजी नाट्य सुरू झालं आहे.. या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत कायमस्वरूपी होत आले आहे मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत गणित बदलल असून ही जागा महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला सुटली आहे.. यामुळे राष्ट्रवादीत नाराजी निर्माण झाली असून आघाडीने निर्णय न बदलल्यास वेगळी चूल मांडण्याचा निर्धार राष्ट्रवादीने केला आहे..
1999 मध्ये पक्षाची स्थापना झाल्यापासून राष्ट्रवादीकडे शरद पवारांचा हात धरणारे जळगाव जिल्ह्यातील पहिले अरुण भाई गुजराथी.. त्यामुळे अरुण भाईंना शरद पवारांनी नगर विकास मंत्री,विधानसभा अध्यक्ष आणि हल्लीही यशवंतराव चव्हाण यांचे सदस्य म्हणून घेतले आहे..मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला चोपडा विधानसभेची जागा सुटल्यामुळे राष्ट्रवादीत अन्यायाची भावना निर्माण झाले आहे. या मतदारसंघात माजी आमदार जगदीश वळवी यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती तर अरुण बहिणी माझे नाव सुचवल्याचे सांगितलं होतं.. मात्र या जागेवर ठाकरे गटाला संधी मिळाला असल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे.
या चोपडा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राजू तडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने दावा केलेल्या मतदारसंघावर ही ठाकरे गटाने दावा केल्याने महाविकास आघाडीत नाराजीचा सूर पसरला आहे.. दरम्यान या मतदारसंघात प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे समोर त्यांचे आव्हान किती टिकेल ही सांगता येणार नाही.. तसेच त्यांच्या बहिणीने देखील अख्खा मतदारसंघ पिंजून काढला आहे.. त्यामुळे या चोपडा मतदारसंघात कोण तगड आव्हान उभ करेल आणि कोण जिंकल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..