जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | ” मी पुन्हा येईन साठी किती रडीचा डाव खेळणार सभागृहात न जाता बाहेर शो दाखवून काय मिळवाल ” अशा शेलक्या शब्दात जळगाव जिल्हा बँकेच्या चेरमन रोहिणी खडसे यांनी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. रोहिणी खडसे गेल्या काही दिवसांपासून फडणवीस यांच्यावर ट्विटर वरून टीका टिप्पणी करीत आहे. सध्या त्यांनी केलेले व्यक्तव्य अधिक चर्चेत राहत आहे. आपल्या परिवारावर ईडी च्या कार्यवाहीचे संकट कोसळेले असताना रोहिणी खडसे यांनी पुढे येत ट्विटर वर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
एमआयडीसी भोसरी भूखंड प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावाई गिरीश चौधरी यांची गेल्या दोन दिवसांपासून चौकशी सुरू होती भोसरी प्रकरणात महत्वपूर्ण धागेदोरे जुळून आल्याने गिरीश चौधरी यांना ईडी कडून पुणे येथून अटक करण्यात आली आहे. खडसे यांच्या जावाईच्या अटकेमुळे राजकीय क्षेत्रांत खळबळ माजली आहे.
जावाई गिरीश चौधरी यांनाच अटक झाल्याने माजी मंत्री खडसे यांच्या भोवती ईडी चा ससेमिरा पुन्हा एकदा सुरू झाला आहे. यामध्ये जिल्हा दूध संघाच्या चेरमन मंदाकिनी खडसे यांच्या नावे भोसरी येथील भूखंड असल्याने त्यांची देखील ईडी ची चौकशी करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे.