राजमुद्रा : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना आता राजकीय पक्षांकडून उमेदवारी याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यानंतर आता उमेदवाराकडून आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत..या पार्श्वभूमीवरच .रावेर विधानसभा भाजपा व महायुती अधिकृत उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांचा “नामनिर्देशन अर्ज” भाजपा नेते गिरीष महाजन व केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल करण्यात आला..
भाजपा व माहिती अधिकृत उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या अर्ज दाखल करण्यासाठी भव्य संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी म.प्र.माजी मंत्री आ.अर्चना चिटणीस तसेच जिल्ह्यातील भाजपा व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते यांनी “भव्य विजय संकल्प रॅली”मध्ये सहभागी होऊन, सभेमध्ये उपस्थित जनसागरास संबोधुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी* यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी अमोल जावळे यांना महायुती उमेदवार म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी, प्रत्येक बुथवर जास्तीतजास्त मतदानसाठी प्रयत्न करण्याचे यावेळी आवाहन केले.