राजमुद्रा : विधानसभा निवडणुका काही दिवसावरच येऊन ठेपल्या असताना आता राजकीय पक्षांकडून अंतिम याद्या जाहीर करण्यात येत आहेत.. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चौथी यादी जाहीर केले आहे.. या यादीत ७ जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
माण मतदारसंघ – प्रभाकर घार्गे
काटोल-सलीलअनिल देशमुख
खानापूर-वैभव पाटील
वाई-अरुणादेवी पिसाळ,
दौंड-रमेश थोरात
पुसद- शरद मेंद
सिंदखेडा-संदीप बेडसे
दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून याआधी तीन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान आहे तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे.. मात्र या निवडणुकीआधी राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचारांचा धडाका मतदारसंघात लावला जात आहे.. या आधी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून तिन्ही यादी जाहीर करण्यात आले आहेत..