राजमुद्रा : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना उद्धव ठाकरेंनी चोपड्यातील जाहीर केलेला उमेदवार ऐनवेळी बदल आहे… या चोपडा मतदारसंघातून याआधी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून राजे तडवी यांच्या नावाची घोषणा झाली होती.. मात्र आता प्रभाकर सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.. त्यामुळे या मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रभाकर सोनवणे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे चंद्रकांत सोनवणे यांच्यात लढत होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.. मात्र अर्ज भरण्यासाठी एक दिवस बाकी असताना आता ठाकरे गटाने उमेदवार बदलला असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे.भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना आता चोपडा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाला सुटला आहे.. त्यानुसार उमेदवार जाहीर झाल्यानंतर ऐनवेळेस ठाकरे गटाकडून उमेदवार बदलवून भाजपमधून आलेले प्रभाकर सोनवणे आता रिंगणात उतरले आहेत.. आता या मतदारसंघात बाजी कोण मारणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे..