राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मोर्चांचा धडाका लावला आहे.. या पार्श्वभूमीवरच मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला… यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार घनाघात केला आहे.. महायुती सरकारने केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महाविकास आघाडीच्या पोटात किती गोळा उठलेला आहे आपल्याला माहिती आहे.. असा टोला त्यांनी लगावला आहे..
ही योजना बंद करण्यासाठी काँग्रेसवाले कोर्टात गेले तसेच महाविकास आघाडीतील काही नेते जसे की उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी योजना बुडवणारी असल्यास बोलले.. मात्र ही योजना कायमस्वरूपी असूनलाडक्या बहिणी योजनांमुळे या लाडक्या बहिणी निश्चितच आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत ..आमचं सरकार असेपर्यंत ही योजना बंद होणार नाही आणि पुन्हा सरकार आल्यानंतर निश्चितच आम्ही पैसे वाढवून देवू असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सांगितला आहे. असेही मंत्री गिरीश महाजन म्हणाले..
दरम्यान राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली आहे..मात्र शेवटी आम्ही तीनही एकत्र आहोत आणि तिघांनी मिळून एकत्र सत्ता आम्हाला आणायचे आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वजण आणि आम्ही एकत्रच आहोत आणि यापुढेही एकत्र राहू असं सांगत त्यांनी आघाडीवर निशाणा साधला..