राजमुद्रा : विधानसभा निवडणुका अवघ्या दिवसांवर येऊन ठेपल्या असताना शिवसेना शिंदे गटाच्या माजी आमदार आणि केलेल्या पक्षाविषयीच्या विधानाने राजकारण चांगलच तापणार आहे….ऐन निवडणुकीच्या काळात शिंदे गटाचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी शिवसेना ही सुंदर स्त्री आहे. पण गळ्यात मंगळसूत्र नसल्यामुळे आज तिचे लचके तोडले जात आहेत, असं विधान केला आहे.. त्यामुळे आता पक्ष त्यांच्याविषयी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..
सदानंद चव्हाण यांनी पक्षाविषयी नाराजी व्यक्त करताना लायसन्स आणि मंगळसूत्र नसल्यामुळे आता शिवसेनेला कोणीही शिट्या मारेल, असं म्हटलं आहे.दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण- संगमेश्वर मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळाली नसल्यामुळे नाराज आहेत. माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्याकडून नाराजी व्यक्त करताना शिवसेनेचा मंगळसूत्र नसलेली सुंदर स्त्री म्हणून उल्लेख केला आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. सदानंद चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार सदानंद चव्हाण रत्नागिरीतील चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातुन लढण्यास इच्छुक होते.. मात्र या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरु होती. मात्र अखेर ही जागा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सुटली त्यामुळे अनेक जण नाराज झाले.. या मतदारसंघात अजित पवार गटाने शेखर निकम यांना उमेदवारी दिली आहे.. मात्र आता आपल्या पक्षाबाबत सदानंद चव्हाण यांनी केलेल्या विधानाने राजकीय वातावरण चांगलं तापणार आहे.