राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या अंतिम उमेदवारी याद्या जाहीर केल्या आहेत .. यामध्ये एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेनेही उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या. परंतु पालघरमधून आमदार श्रीनिवास वनगा (Shrinivas Vanga) यांचे तिकीट कापून राजेंद्र गावित (Rajendra Gavit) याना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे श्रीनिवास वनगा प्रचंड दुखावले गेले.. या नाराजीमुळे ते सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता होते… अखेर ३६ तास उलटल्यानंतर अखेर ते घरी परतले..
उमेदवारी न मिळाल्याच्या कारणावरून श्रीनिवास वनगा हे सोमवारी रात्रीपासून नॉट रिचेबल झाले होते. गेल्या ३६ तासांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. आता अखेर ३६ तासांनंतर श्रीनिवास वनगांचा कुटुंबियांशी संपर्क झाला आहे. ते रात्रीच्या वेळी घरी आल्याची माहिती समोर आली आहे.. मात्र ते नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात होते..
राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच सर्व पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होत असून अनेकांनी उमेदवारी अर्जदेखील दाखल केले आहेत