राजमुद्रा : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्य लढत असली तरी राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष मोठ्या ताकदीने या निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.. या निवडणुकीवरून व सध्याच्या राजकीय घडामोडीवर भाष्य करताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी फटकारे दिले आहेत..राजकारणात तिरकी चाल खेळणाऱ्यांच्या पदरात पदे पडतात.. पण अशी राजकीय पोलीस जास्त काळ शिकता येत नाही असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांवर लगावला आहे..
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत.. माहीम विधानसभा मतदारसंघातून ते आपले नशीब आजमावणार आहेत..
मात्र माहीमध्ये माहिममध्ये महायुतीने उमेदवार द्यावा की नाही याविषयी राज ठाकरे यांनी रोखठोक मत मांडलं आहे.एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत. माझा मुलगा या ठिकाणी उमेदवार आहे. चांगल्या हेतूने त्यांना उमेदवार द्यायचे नसतील, तर ते नाही देणार उमेदवार, त्यांना उमेदवार द्यायचा असेल तर त्यांनी द्यावा. मी कोणती ही मागणी करणार नाही. जर ते पाच वर्षानंतर उमेदवार उभा करणार असतील तर त्यांनी तो आताच द्यावा, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. सध्या मुंबईतील माहीम मतदारसंघावर सर्वांचेच लक्ष लागले आहे. मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघात मनसे विरुद्ध शिंदे विरुद्ध ठाकरे अशी बिग फाईट पाहायला मिळणार आहे.
येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येतील. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे