राजमुद्रा : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपले असताना उमेदवारांनी प्रचारांचा मतदारसंघातून धडाका लावला आहे या पार्श्वभूमीवरच धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अनुप अग्रवाल यांनी धुळे शहरातील गांधी पुतळा ते संपूर्ण आग्रा रोडवरील व्यापारी वर्गाला माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत भेटी दिल्या. यावेळी छोट्या व्यापाऱ्यांपासून ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांशीच धुळे शहरातील व्यापार वाढीच्या अनुषंगाने विचार मांडले. त्यावर व्यापारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.तसेच येणाऱ्या निवडणुकीत तुमच्या हिंदुत्वादी आणि विकासाच्या दृष्टीने असलेल्या विचाराला मतपेटीत मत देवून बळकट करु असा विश्वास दिला. यावेळी धुळे शहराच्या विकासासाठी आपल्यासोबत ठामपणे उभे असलेला हा व्यापारी वर्ग आत्मविश्वास वाढवून गेला.
यावेळी येत्या २० तारखेला शंभर टक्के मतदानासाठी बाहेर पडून आपल्या हिंदुत्वाचा भगवा अभिमानाने फडकवा अशी भावना व्यक्त केली.यावेळी माजी खासदार डॉ. सुभाष भामरे ,माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजप धुळे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, विनोद मित्तल, ओम खंडेलवाल, कमलाकर अहिरराव, प्रदीप पानपाटील, प्रवीण अग्रवाल, पवन जाजू, सोनू शिंदे, जितू शेठ, महावीर संघवी, राजेश साबद्रा, हर्षल विभांडीक , नितीन बंग, राजेश गिंडोडिया, हर्ष भाई रेलन, कल्याणजी अग्रवाल, तुषार धुपड, संजय अग्रवाल, नितेश रुणवाल, सुरेश बंग, गोपाल माने, जगदीश अग्रवाल, अभय शेठ नाशिककर, अजय पसारी, विनोद सोमानी, पंकज मुंदडा, सुशील कोपली, कैलास अग्रवाल, अभिषेक अग्रवाल, किशोर भंडारी, सुमित खंडेलवाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.