राजमुद्रा : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना महायुतीच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चेला उधाण आला आहे.. विधानसभेनंतर आमची सत्ता येणार असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून वारंवार केला जात आहे… अशातच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं आहे. राज ठाकरेंनी केलेल्या विधानानंतर महायुतीची सत्ता येणारच याला आम्ही महत्व देतो पण यापेक्षा मुख्यमंत्री निवडून आलेल्या संख्येनुसारच ठरणार संजय शिरसाट म्हणाले
विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना गेल्या काही दिवसापासून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातून नेमका पुढील मुख्यमंत्री कोण होणार? असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर तर्कवितर्क लावले जात आहेत.. दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेनाला टोला लागला होता..आमची निशाणी कमावलेली आहे. आम्ही निशाणी ढापलेली नाही असं म्हणत त्यांनी शिंदे यांच्या सेनेला टोला लगावला होता यावरून बोलताना संजय शिरसाट म्हणाले, आम्ही मुळात शिवसेना सोडलेलीच नाही. आमची शिवसेना शिवसेनाप्रमुखांची शिवसेना आहे. झेंडा आमच्याकडे आहे निशाणी आमच्याकडे आहे त्यामुळे आम्ही ढापण्याचा प्रश्नच येत नाही.
दरम्यान गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारून महायुतीला धक्का दिला होता.. आता आगामी विधानसभेसाठी महायुती जोमाने मैदानात उतरले असून आधीक उमेदवार मतदारसंघात उतरले आहेत. त्यामुळे येणाऱ्या 20 नोव्हेंबरच्या मतदानानंतर निकालात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.