राजमुद्रा : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना सर्व राजकीय पक्षाच्या उमेदवाराकडून प्रचारांचा धडाका लावला जात आहे.. अशातच आताचोपडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांना प्रचारासाठी जात असताना हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे.
प्रभाकर सोनवणे हे जळगाव येथून चोपड्याला प्रचारासाठी जात असताना प्रवासात त्यांना वाहनात हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाली आहेत्यांना जळगावच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून रुग्णालयात त्यांच्यावर एन्जोप्लास्टी करण्यात आल्याची माहिती आहे.
प्रभाकर सोनवणे यांची प्रकृती आता चांगली असून त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात मोठी गर्दी झाली आहे.. मात्र आता त्यांची तब्येत चांगली असून ते लवकरच बरे होऊन प्रचार साठी बाहेर पडतील , असं त्यांचा मोठा मुलगा प्रभाकर सोनवणे यांनी सांगितला आहे.