राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने शिवाजीनगर-मानखुर्दमधून नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे.. मात्र त्यांच्या या उमेदवारीला महायुतीमधील प्रमुख पक्ष भाजपाचा विरोध आहे. त्यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला जातो. याच मुद्यावर बोलताना नवाब मलिक यांनी ठणकावून सांगितला आहे… मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार आहे. मी आग्रह धरत नाही की, तुम्ही प्रचाराला या.नका करू माझा प्रचार जे दाऊदशी माझं नाव जोडतात, त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार असे स्पष्ट त्यांनी सांगितलं..
विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारासाठी महायुतीतील घटक पक्षांचा विरोध असताना देखील राष्ट्रवादीनेच मला एबी फॉर्म दिलाय. माझ्यावर विश्वास टाकला आहे. भाजपा विरोधात असली, तरी मी एनसीपी म्हणून निवडणूक लढवणार आणि जिंकून येणार असेही नवाब मलिक म्हणाले आहेत…
दरम्यान वारंवार दाऊदशी संबंध असलेल्या व्यक्तीचा प्रचार करणार नाही, असं महायुतीकडून म्हटलं जातय. “असे आरोपी कोणी करत असेल, तर मी नोटीस पाठवली आहे, पाठवणार आहे. काही मोठ्या वर्तमानपत्रांनी अशा बातम्या दिलेल्या पण ते आता थांबले आहेत”आरोप करणारा .कितीही मोठा नेता असला, तरी मी कायदेशीर कारवाई करणार” असं नवाब मलिक म्हणाले.