राजमुद्रा | जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभेतील ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर सोनवणे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने राजकीय खळबळ माजली आहे. स्वतः उमेदवार असताना प्रभाकर सोनवणे यांना आलेल्या हृदय विकाराच्या झटक्या मुळे जळगाव जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण ढवळून झाला आहे,
मात्र वेळीच उपचारार्थ रुग्णालयात दाखल केल्यामुळे प्रभाकर सोनवणे यांच्यावर एन्जोप्लास्टी करण्यात आली , धोका टळला आहे, ते सुखरूप बचावले आहे. स्वतः उमेदवार असल्याने निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर सोनवणे यांना मोठा संघर्ष या निमित्ताने करावा लागत आहे.
सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपली ताकत पणाला लावली आहे. जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या टोकाला चोपडा विधानसभा मतदारसंघांमध्ये जोरदार राजकीय घडामोडी घडल्या, ठाकरे गटाचा उमेदवार बदलून चोपड्या मध्ये प्रभाकर सोनवणे यांना संधी देण्यात आली, ठाकरे गटाकडून राजू तडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र शेवटच्या क्षणाला उमेदवार बदलून ऐन वेळेस प्रभाकर सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली , यामुळे चोपडा विधानसभेचे संपूर्ण निवडणुकीचे चित्र बदलले आहे.
प्रभाकर सोनवणे रुग्णालयात दाखल असले तरी मात्र महाविकास आघाडीचे सर्वच नेते चोपडा विधानसभेमध्ये कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. व्यक्तिगत खाजगी यंत्रणा मोठ्या प्रमाणात कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती त्यांचे सुपुत्र दिनेश सोनवणे यांनी दिली आहे.
वैद्यकीय तसेच राजकीय असे दोन्ही संघर्ष प्रभाकर सोनवणे यांना करावा लागत आहे. मात्र अशाही परिस्थितीत जनतेच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही, संघर्ष कितीही असला तरी निवडणुकांना सामोरे जाऊ, चोपडा विधानसभेचं आणि तालुक्याचे दायित्व आम्ही स्वीकारल आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत चोपडा तालुका वासियांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याची आमची तयारी असल्याचा विश्वास दिनेश सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. वडिलांना झालेल्या अचानक दुखापतीमुळे संपूर्ण परिवार च चोपडा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची चिन्ह आहेत.